मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं
मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं
या चौघांच भांडण झालं
कशावरून कशावरून
एवढ्याश्या खोब-याच्या तुकड्यावरून
आजी आली पदर खेचून
एकेकाला काढला चांगलच ठेचून
पाट्यावर केली वाटणी
त्याची झाली चटणी
चटणी ठेवली बशीत
जेवण झाला खुशीत
बाबा हसले मिशीत

0 अभिप्राय:
Post a Comment